नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

Join the forum, it's quick and easy

नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
Would you like to react to this message? Create an account in a few clicks or log in to continue.
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


किल्ले नळदुर्ग

Go down

किल्ले नळदुर्ग Empty किल्ले नळदुर्ग

लिखाण  Admin Sat May 19, 2012 11:34 pm

किल्ले नळदुर्ग 6756_Naldurg

महाराष्ट्राचे गिरीदुर्ग, जलदुर्गाबरोबरच अनेक महत्त्वाचे असे वैशिष्ट्यपूर्ण भुईदुर्ग किंवा भुईकोट किल्ले आहेत. या भुईकोट किल्ल्यांमध्ये महत्त्वाचा असा किल्ला म्हणजे नळदुर्ग होय.

नळदुर्ग किल्ला हा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तुळजापूर तालुक्यात आहे. पुणे - हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गावर नळदुर्ग आहे. सोलापूरकडून हैद्राबादकडे निघाल्यावर सोलापूर पासून ५० कि.मी. अंतरावर नळदुर्ग गाव आहे. या गावातच नळदुर्ग हा अप्रतिम बांधकामाचा हा अजोड किल्ला आहे.

स्थानिक लोक नळदुर्गाचा इतिहास नळराजा व दमयंती राणी पर्यंत नेऊन पोहोचवितात. हा किल्ला कल्याणीच्या चालुक्य राजाच्या ताब्यात होता. पुढे तो बहमनी सुलतानांच्या ताब्यामध्ये होता. बहमनी राज्याची शकले उडाली व त्यातुन ज्या शाह्या निर्माण झाल्या त्यामधील विजापूरच्या आदिलशहीने नळदुर्गावर कब्जा मिळवला. पुढे औरंगजेब या मोगल बादशहाने नळदुर्ग जिंकला आणि त्याची जबाबदारी हैद्राबादच्या निजामाकडे सोपवली.

सध्याच्या नळदुर्ग किल्ल्याची उत्तम बांधणी आदिलशहाच्या काळामध्ये झालेली आहे. संरक्षणासाठी किल्ल्याच्या भोवती मोठ्या भागात खंदक आहे. त्याच्या आतल्या बाजूला दुहेरी तटबंदी आहे. किल्ल्याच्या बाजुच्या पठारावर रणमंडळ म्हणून तटबंदीने युक्त असा भाग आहे. रणमंडळ आणि नळदुर्ग यांच्यामध्ये असलेला खंदक खोल करण्यात आला असून त्यात पाणी आहे. हे पाणी बोरी नदीचा प्रवाह अडवून तो वळवून या खंदकात आणण्यात आला. हे पाणी कायम रहावे म्हणून रणमंडळ आणि नळदुर्ग या मध्ये धरणाच्या बंधार्‍या सारखी भिंत बांधण्यात आली आहे. या भिंतीमुळे खंदकामध्ये कायमस्वरुपी पाणी साठून रहाते. त्यामुळे या बाजुने शत्रुला किल्ल्यामध्ये शिरकाव करता येत नाही. खंदक आणि नदीचा प्रवाह याने अभेदता निर्माण करुन आतमध्ये शंभरावर बुरुजांनी जोडलेली भक्कम तटबंदी आहे.

वेगवेगळ्या आकाराच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या बुरुजांचे बांधकाम आपल्याला दिसून येते. यामध्ये वैशिष्ट्यपुर्ण असलेला नवबुरुज आपल्या लक्षात रहातो. हैद्राबाद महामार्गाच्या बाजुला असलेल्या तटबंदीमध्ये हा बुरुज आहे. या भल्याथोरल्या बुरुजाला नऊ पाकळ्या आहेत. यामुळे याला नवबुरुज म्हणतात . असे बांधकाम इतरत्र कोठेही पहायला मिळत नाही.

नळदुर्ग किल्ल्यामधील जलमहाल असणारा बंधारा हे पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण आहे. रणमंडळ आणि नळदुर्ग यांना जोडणार्‍या बंधार्‍यामध्ये जलमहाल आहे. या बंधार्‍याची उंची १९ ते २० मीटर उंच आहे. बंधार्‍यामध्ये चार मजले आहेत. बंधार्‍याच्या पोटातील या मजल्यामध्ये जाण्यासाठी पायर्‍यांचा मार्ग आहे. बंधार्‍याच्या पोटामध्ये अर्ध्या उंचीवर हा जलमहाल बांधलेला असून याच्या खिडक्या नक्षीदार महीरपीने सजवलेल्या आहेत. याच्या भिंतीवर फारशी लिपीतील शिलालेख आहे. याचा अर्थ असा होतो की, या जलमहालाकडे दृष्टी टाकल्यास मित्रांचे डोळे प्रसन्नतेने उजळतील तर शत्रुचे डोळ्यापुढे अंधारी येईल. पावसाळ्यामध्ये पाणी वाढल्यावर या बंधार्‍यामधून वाहून जाण्यासाठी दोन मार्ग ठेवलेले असून त्यांना नर व मादी अशी नावे आहेत. या दोन धबधब्यामधून पावसाळ्यात काही वेळा पाणी वहाते. तेव्हा सोलापूर भागातले हजारो पर्यटक ते पहाण्यासाठी गर्दी करतात.

नळदुर्ग किल्ला त्याची रचना, संरक्षण व्यवस्था, टेहाळणीचा उपळ्या बुरुज, त्यावरील लांब तोफ दरवाजाचा वक्राकार मार्ग यामुळे चांगलाच लक्षांत रहातो. कर्नल मेडोज टेलर याने म्हटले आहे,आजपर्यंत पाहिलेल्या अनेक स्थळांमध्ये नळदुर्गचा किल्ला ही मोठी आकर्षक जागा आहे.
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

https://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही