नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


संत ज्ञानदेव

Go down

संत ज्ञानदेव  Empty संत ज्ञानदेव

लिखाण  Admin on Sun May 20, 2012 12:20 am

संत ज्ञानदेव  6362_MahaS

गुरुवार, कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८ या दिवशी प्रात:काळी काहीशा निरुत्साहाने उगवलेला सूर्य भर माध्यान्ही क्षणभर ढगाआड गेला. एरवी कुठल्याही बर्‍यावाईट घटनेला वा अडीअडचणीला धीराने सामोरे जाणारे संत आणि गंभीर वृत्तीचे सज्जनही पार गोंधळून गेले. ' रडणे बरे दिसणार नाही ' म्हणून महत्प्रयासाने अश्रूंना थोपवून धरले तरी त्या सार्‍यांचेच कंठ पुन:पुन्हा दाटून येत होते. ज्या भिंतीवर बसून चारही भावंडे चांगदेवांना भेटण्यासाठी गेली होती ती भिंतदेखील दु:खावेगाने कोसळली.

ज्ञानदेव गेले तेव्हा, कोसळली भिंत ।
वेद झाले रानभरी, गोंधळले संत।।

ज्ञानोबांच्या सहवासाने पावन झालेली इंद्रायणी एरव्ही कशी भरभरुन वाहत असे ! पण आज अचानक तिचे पाणीच आटले. मराठीचा एवढा मोठा बहरलेला वटवृक्ष त्याच्या तळवटी पाणी जळू लागले. नेहमी स्थितप्रज्ञपणे वागणारे निवृत्तिनाथ आज पार कोसळले, तनाने आणि मनानेही ! आसवांनी भरलेले त्यांचे डोळे रडून रडून जणू निस्तेज होऊ लागले.

ज्ञानदेव गेले तेव्हा, आटे इंद्रायणी ।
मराठीच्या वडातळीं, जळूं लागे पाणी।।
ज्ञानदेव गेले तेव्हा, ढळला निवृत्ति ।
आसवांच्या डोही झाली, विझू विझू ज्योती।।

मी देवाच्या पायतळीची वीट कधी होईन बरे? अशा शब्दांत ज्ञानोबांनी जिचे कौतुक केले होते, त्या विटेलाही दु:खावेगाने तडा गेला.

प्रत्यक्ष पांडुरंगाला जे वाटत होते, ते तर नुसते व्यक्त करण्यासही योग्य शब्द नव्हते. पांडुरंगाच्या मनात भावभावनांचा कल्लोळ दाटून आला होता. सर्व भक्तमंडळी माझी लेकरे. नामदेव भोळा म्हणून जरा जास्तच लाडका. निवृत्ती योगमार्गातील अधिकारी म्हणून मला प्रिय. जनी अनाथ म्हणून तिच्याबद्दल मला अधिक जिव्हाळा, असे असले तरीही या सर्वांमध्ये उठून दिसायचा तो माझा ज्ञानी ज्ञानदेव. मी चतुराईने सार्‍यांच्या तावडीतून सुटत असे. पण ज्ञानदेवाची गोष्टच वेगळी. त्याने आपल्या टपोर्‍या, पाणीदार डोळ्यांनी नुसते माझ्याकडे बघितले तरी माझी कोण त्रेधातिरपीट उडत असे! त्याचे ते खोल जलाशयासारखे डोळे नुसत्या दृष्टिक्षेपातच खूप काही सांगून जात. कोवळ्या वयात किती किती सहन करावे लागले याला. एकाच भरारीत विश्वच जिंकून गेला. अगदी थोड्या वेळात केवढे महान कार्यकर्तृत्व याने करून दाखविले. त्याला मोठे, अधिक मोठे झालेले बघण्यातला आनंद मलाही किती सुखावीत होता. तो आनंद अगदीच अल्पजीवी ठरला. याच्यासाठी आपण काही करावे, उन्हातान्हात रानोमाळ भटकून याच्या पायाला फोड आले होते, कोणालातरी सांगून त्या पायांना लोणी लावून द्यावे, याला काय हवे-नको पाहावे, प्रेमाने जवळ घेऊन त्याची विचारपूस करावी, असे फार मनात होते. पण तसे काही विचारण्याची संधी याने मला दिलीच नाही. एके दिवशी सरळ म्हणाला, 'मी आता संजीवन समाधी घेतो' किती घाई केली याने ! मी 'नाही' कसे म्हणणार ? लेकरू इतके लाघवी की, त्याला ' नाही ' म्हणणे कोणालाही शक्य होत नसे. इतर सारी मला विठोबा, विठ्ठल, पांडुरंग अशा नावांनी हाका मारीत. याने मात्र मला बापरखुमादेविवरु म्हणून गौरविले. तेही कसे तर ' स्व 'त्व विसरुन बापरखुमादेविवरू हीच नाममुद्रा अभंगलेखनासाठी घेऊन ....'

....अशा आठवणींच्या भाऊगर्दीत लाडक्या लेकराच्या अवचित संजीवन समाधी घेण्याच्या निर्धाराने विठ्ठल देव खचला. लाडक्याच्या वियोगाने कमरेत वाकला.

ज्ञानदेव गेले तेव्हा, तडा विटे गेला।
बापरखुमादेविवरु, कटीत वाकला।।
ज्ञानदेव गेले तेव्हा , बापुडला नामा।
लागोपाठ भावंडें तीं गेली निजधामा।।
माझ्या ज्ञानराजा, तें रे कळों आले आज।
भरदुपारीं ही तशी झाली तीनसांज।।
तेव्हांच्यासारखा, पुन्हा बावला मोगरा।
भुईभर झाल्या कळ्या, तुटला आसरा।।
इथे आळंदीत आतां ऊर फाटे।
पंढरीच्या वाटेंतही, बाभळीचे काटें।।
कळ्यांचाहि वास जिवा, जाहलासे फांस।
एकाकीं प्रवास आतां, उदास उदास।।

कविवर्य बा. भ. बोरकरांनी प्रत्येक मराठी माणसाचे मनोगत या शब्दांमधून व्यक्त केले आहे. या बापरखुमादेविवराच्याच नव्हे तर तुम्हां-आम्हां सार्‍यांच्याच लाडक्या ज्ञानरायाला साश्रू नयनांनी भक्तिभावनेने नमस्कार करुया.
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

http://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही