नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

Join the forum, it's quick and easy

नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
Would you like to react to this message? Create an account in a few clicks or log in to continue.
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


विदर्भातील अष्टविनायक

Go down

विदर्भातील अष्टविनायक Empty विदर्भातील अष्टविनायक

लिखाण  Admin Sun May 20, 2012 12:57 am

विदर्भातील अष्टविनायक 5621_Mahasankruti
संसारी माणसाला भय असते ते संकटांचे. संकट निवारण करणाराच आपलासा झाला म्हणजे संकटांची भितीच नाहीशी होते. त्यामुळेच विघ्नहर्त्या गणपतीची आराधना लोकप्रिय झाली आहे.

गणपतीची आराधना अथर्ववेदपूर्व काळापेक्षाही जास्त जुनी आहे. गणपतीलाही साधारण जनतेच्या दैवताचा मान मिळाला तो अथर्ववेद काळात. गणपतीची पूजा केल्याने सर्व विघ्नांचा नाश होतो हा विश्वास लोकांमध्ये दृढ झाला तो ही याच काळात. विघ्नहर्ता असल्याने गावाच्या रक्षणासाठी विनायकांची स्थापना गावाच्या वेशीवर केलेली आढळते. महाराष्ट्राचे जसे अष्टविनायक आहेत तसेच विदर्भातही अष्टविनायक आहेत. तिथल्या स्थानिक लोकांमध्ये त्यांच्याबद्दल श्रद्धा आहे. या अष्टविनायकांनाही आता लोकमान्यता मिळते आहे.

टेकडीचा गणपती :
नागपूर शहरात मध्यवर्ती असलेले सिताबर्डी नावाच्या टेकडीवरचे हे मंदिर. साधेच परंतु ऐसपैस असे आहे. झाडाच्या प्रचंड मोठ्या बुंध्याशी शांतपणे टेकून बसलेली वाटावी अशी गणपतीची भव्य मूर्ती मंदिरात प्रवेश करताच लक्ष वेधून घेते. डोक्यावर मोठ्ठा मुकुट धारण केलेली आणि मंदिरात कुठूनही थेट दर्शन होणारी ही मूर्ती आहे. गणपतीच्या डोक्यावर गंधाच्या ठिकाणी लाल रंगाचा चमचमता हिरा आहे. पूर्वी हे मंदिर हेमाडपंथी होते. पण परकीय आक्रमणात ते उद्ध्वस्त झाले. त्यानंतर काही काळाने १८६६ साली ती मूर्ती पुन्हा सापडली आणि तेथे मंदिर बांधण्यात आले. हा गणपती नागपूरकरांचे आराध्य दैवत आहे. माघ महिन्यातील चतुर्थीला येथे मोठा उत्सव असतो लाखोंच्या संख्येने भक्त या काळात गणपतीच्या दर्शनाला येतात.

श्री एकचक्रा गणेश :
केळझराचा एकचक्रा गणेशाची स्थापना प्रत्यक्ष पांडवांनीच केल्याची दंतकथा आहे. आजचे केळझर पुराणकाळात एकचक्रानगरी या नावाने प्रसिद्ध होते. पांडवांनी कुंतीसह या नगरीत अज्ञातवासात असतांना आश्रय घेतला होता. इथेच त्यांनी बकासुराचा वध केला होता. बकासुराच्या वधानंतर पांडवांनी गणपतीचे पूजन केले हाच तो एकचक्रा गणेश. वसिष्ठ ऋषींनीही याची स्थापना आणि आराधना केली असल्याचे या भागात प्रसिद्ध असलेल्या आख्यायिकांवरुन कळते.

केळझरचा एकचक्रा गणेशाचे वैशिष्ट्य म्हणजे इथल्या गणपतीला वैशिष्ट्यपूर्ण रितीने लावण्यात येणारा शेंदूर. शेंदूर लावण्याच्या विशिष्ट पद्धतीमुळे मुळातच सुंदर असलेली गणपतीची मूर्ती अधिकच सुरेख भासते. केळझर हे वर्धा जिल्ह्यात आहे.

शमी विघ्नेश - आदासा :
नागपूरपासून ३५ कि.मी. अंतरावर असणार्‍या आदासा गावचा वक्रतुंड शमीविघ्नेश हा या अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती. या गणपतीचे मंदिर काहीसे उंचावर असे आहे. अठरा फूट उंच, सात फूट रुंद आणि आठ हातांची ही गणपतीची मूर्ती आगळी वेगळी अशी आहे. गाभार्‍यात प्रवेश करताच मूर्तीची भव्यता नजरेत भरते. बळी राजाने गणपतीचा अग्रपुजेचा मान हिरावल्याने वामनाने बळी राजाला धडा शिकवायचे ठरवले. त्यापूर्वी वामनाने या गणपतीची स्थापना केल्याची एक आख्यायिका सांगितली जाते. गंमत म्हणजे हा गणपती लग्नाळू मुला-मुलींना मदत करतो असा दृढ समज आहे. त्यामुळे हव्या त्याच मुलीशी किंवा मुलाशी लग्न व्हावे म्हणून या गणपतीच्या दर्शनाला येणार्‍या उपवर वधूंची गर्दी असते.

टेकडीवरून दिसणारे टुमदार आदासा गाव आणि सभोवतालची निसर्गसृष्टी मन सुखावून जाते. गणपतीच्या मंदिराबाहेर मिळणारी उकडलेली बोरे, तिखट-मीठ लावलेले पेरू आणि रानमेव्यावर येथे येणारे भक्त ताव मारताना दिसतात.

कळंबचा श्री चिंतामणी :
यवतमाळपासून २० कि.मी. अंतरावर असणारे कळंब श्री चिंतामणी मंदिरामुळे कायम गजबजलेले असते. ऋग्वेदकाळात कळंब हे गाव भदंबपूर या नावाने प्रसिद्ध होते. कळंब येथील मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे. ३५ फूट खोल कुंडामध्ये हा गणपती आहे. ही गणपतीची मूर्ती दक्षिणमुखी आहे. इंद्राने गौतमऋषींच्या शापातून मुक्त होण्यासाठी इथे गणपतीची तपश्चर्या केली अशी आख्यायिका इथे प्रचलित आहे. चिंता दूर करणार्‍या या चिंतामणीचे दर्शन घ्यायला लोक दूरवरून येतात. इथे गणेशचतुर्थी ते अनंतचतुर्दशीपर्यंत उत्सव असतो. या काळात लोकांची अलोट गर्दी या गणपतीचे दर्शन घ्यायला येते.

श्री भृशुंड गणेश :
भंडारा शहरात असलेला भृशुंड गणेश 'मेंढ्याचा गणपती' म्हणून स्थानिक लोकांत प्रसिद्ध आहे. या गणपतीच्या मूर्तीला लांब दाढी आणि मिश्या आहेत. महर्षी भृशुंडीऋषींचा आश्रम या परिसरात होता. त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि ते स्वत:च गणपतीरुप झाले ती ही मूर्ती असे या गणपतीबाबत सांगितले जाते. गणपतीचे हे मंदिर काही काळ पूर्णपणे दूर्लक्षित होते. एखाद्या कॉलनीतले हनुमान मंदिर असावे तेवढेच आणि तसचं हे मंदिर होते. पण या गणपतीचे महत्व लक्षात येऊन भक्तांनीं आता या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरु केले आहे.

वीर विघ्नेश रामटेकचा :
शंकर आणि गणपती यांचा संबंध दाखविणारा रामटेकचा वीरविघ्नेश वैशिष्ट्यपूर्ण आहे. नागपूरपासून जवळच असलेले रामटेक हे राममंदिरासाठी प्रसिद्ध आहे. इथेच गडाच्या पायथ्याशी आणि प्रदक्षिणेच्या मार्गात गणपतीचे मंदिर आहे. हा गणपती वीरविघ्नेश नावाने ओळखला जातो. मंदिरातील मूर्ती अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि तंत्रशास्त्राच्या दृष्टीने महत्वाची आहे.

चार हातांची गणेश मूर्ती आपण नेहमीच बघतो पण या मूर्तीला अठरा हात आहेत. अठरा हात असलेली ही भारतातील एकमेव मूर्ती असावी. या गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे शंकराच्या आणि गणपतीच्या मूर्तीतील वैशिष्ट्ये एकत्रितपणे या मूर्तीमध्ये दिसतात. या मूर्तीच्या डोक्यावर पाच फण्यांचा नाग आहे. तसेच गळ्यात आणि कमरेलासुद्धा नाग धारण केले आहेत. मूर्तीने अनेक शस्त्रे धारण केली आहेत. त्रिशुळ, परशु, अंकुश, पाश, तलवार, खटवांग, मोदक, कमळ आणि एका हातात मोरपंखाची लेखणी घेतलेली ही मूर्ती बघणार्‍यांचे मन मोहित करते.

श्री गौराळा गणेश :
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे असलेले गणपतीचे स्थान हे अष्टविनायकांपैकी एक आहे. गौराळ्याचा गणपती म्हणून हा गणपती प्रसिद्ध आहे. भद्रावतीच्या दक्षिण दिशेला असलेल्या टेकडीवर हे मंदिर आहे. हे मंदिर अतिशय पुरातन असून गणपतीची मूर्ती अतिशय भव्य आहे. या मूर्तीला दोन हात आहेत. टेकडी आणि भोवतालचा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. या मंदिरात आल्यावर निसर्ग सुंदर गणपतीचे दर्शन घेतल्याचे सुख लाभते.

पंचानन गणेश :
भंडारा जिल्ह्यातील पवनीचा पंचानन गणेश हा ही एक वैशिष्ट्यपूर्ण अष्टविनायकांपैकी एक आहे. पंचानन गणेश असला तरी पाच मुखांची एकच मूर्ती असे या मुर्तीचे स्वरूप नाही तर या पाच वेगवेगळ्या मूर्ती एकमेकींच्या पाठीला पाठ टेकवून बसल्या आहेत. चार दिशांना चार आणि पाचवे नैऋत्य दिशेला तोंड करुन बसलेल्या या मुर्तींना एकत्रितपणे पंचानन गणेश म्हणतात.

या मूर्तीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मूर्ती दगडी नाहीत तर त्या शमीच्या लाकडावर कोरलेल्या रेखीव मूर्ती आहेत. पवनी हे गाव पुरातन काळापासून बौद्ध आणि हिंदू धर्मीयांसाठी उपासनेचे केंद्र राहिले आहे. असंख्य पुरातन मंदिरे हे पवनीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.

असे हे विदर्भाच्या आठ दिशांना असलेले अष्टविनायक. बहुतेक मंदिरांना निसर्गसुंदर परिसर लाभला आहे. त्यामुळे एकदा या मंदिरांना भेट दिलीच पाहिजे अशी ही गणपतीस्थाने आहेत.
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

https://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही