नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

Join the forum, it's quick and easy

नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
Would you like to react to this message? Create an account in a few clicks or log in to continue.
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 3 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 3 पाहुणे :: 1 Bot

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


नगरदेवळ्याची गढी

Go down

नगरदेवळ्याची गढी Empty नगरदेवळ्याची गढी

लिखाण  Admin Sun May 20, 2012 12:59 am

नगरदेवळ्याची गढी 5597_MahaS
नगरदेवळा हे गाव प्रसिद्ध आहे ते तेथील गढीमुळे. आडबाजूला असलेले नगरदेवळा जळगाव जिल्ह्यामधील भडगाव तालुक्यामध्ये आहे. जळगाव ते चाळीसगाव या मध्यरेल्वेच्या मार्गावर नगरदेवळा रेल्वे स्टेशन आहे. जळगाव पासून अथवा चाळीसगावकडूनही गाडी मार्ग आहे. नगरदेवळा गाव रेल्वेस्टेशनपासून तीन चार कि.मी. अंतरावर वसलेले आहे.

रेल्वे स्टेशनकडून नगरदेवळा गावाकडे निघाल्यावर दूरवर अजंठा-सातमाळा रांग दिसू लागते. या रांगेमधील अंतूरचा बलदंड किल्ला नजरेत भरतो. नगरदेवळा गावात पूर्वी अनेक देवळे होती. देवळांचे नगर म्हणून या गावाला नगरदेवळा असे नाव मिळाल्याचे सांगितले जाते.

गावातील एस.टी. स्टँडपासून जवळच गढीचा एक बलदंड बुरुज कसाबसा तग धरून उभा असलेला दिसतो. अशा चार बुरुजांच्या आत पूर्वी गाव होते. आता वस्ती वाढल्यामुळे आजूबाजूला बर्‍याच वसाहती झालेल्या आहेत. वस्तीच्या रेट्याने गढीचा बराचसा भाग गिळंकृत केलेला आहे. गढीच्या मध्यभागी मोठा वाडा आहे. या वाड्याच्या मुख्य दरवाजा कमानवजा आहे. या कमानीमधून आत गेल्यावर उजव्या बाजूला उंच असा झेंडा बुरुज लागतो. एक वैशिष्ट्यपूर्ण असा हा बुरुज आहे. बुरुजाच्या आतून बुरुजावर जाण्याचा मार्ग आहे. अतिशय अरुंद अशा गोलाकार पायर्‍यांवरून आपण बुरुजांवर येवून पोचतो. बुरुजावरील भिंती उंच आहेत. मध्यभागी तोफ ठेवण्याची जागा आहे. तसेच या जागेच्या खाली एक खोली केलेली आहे. तोफेचा दारूगोळा ठेवण्यासाठी तसेच तोफ उडवल्यावर त्याच्या आवाजाने तोफ उडविणार्‍याचे कानाचे पडदे फाटू नये म्हणून लपण्यासाठी या खोलीचा वापर पूर्वी करीत असत. सध्या येथे तोफ नाही. येथे झेंडा फडकविलेला असतो. म्हणून याला झेंडा बुरुज म्हणू लागले. या बुरुजाच्यावर निरीक्षणासाठी सज्जा केलेला आहे. ही जागा संपूर्ण नगरदेवळामधील उंच जागा आहे. या सज्जावरून दूरपर्यंतचा प्रदेश दिसतो. दक्षिणेकडील अजंठा-सातमाळा रांग येथून स्पष्ट दिसते. पाटणाखोर्‍यापासून वैशाकडपर्यंतच भाग पाहता येतो. उत्तरेकडे तापीचा सुपिक प्रदेश असल्यामुळे सर्वत्र सपाट मुलुख आहे. तापीच्या पलिकडील सातपुड्याच्या रांगा स्वच्छ हवामानात पाहता येतात.

बुरुजाच्या आतून पायर्‍या व माथ्यावर निरीक्षणासाठी असलेला सज्जा अशी रचना इतरत्र कुठेही नाही. अशी रचना येथील चारही बुरुजांना होती. बुरुज उतरून आपण वाड्याच्या समोर येतो. वाड्याजवळ पागा, आरसे महल आमि उध्वस्त झालेल्या वाड्याचे जोते आहे. येथील तळघर पाहता येते. या उध्वस्त वाड्याचे तळखडे मात्र तेथे पडलेले दिसतात. येथील दगडमाती इतर रहिवाश्यांनी आपली घरे बांधण्यासाठी काढून नेली.

मुख्य वाड्याच्या दारात संगमरवरी कारंजे पडलेले आहे. या दुमजल वाड्याला लाकडाचे कोरीव काम केलेले आहे. सुबक आणि रेखीव अशा स्त्रियांच्या मूर्ती कोरलेल्या दिसतात. दारावरची गणेशपट्टी पूर्णपणे लाकडात कोरलेली आहे.

वाड्याच्या आत संग्रहालय आहे. ते परवानगी घेऊन पाहता येते. या संग्रहालयातील संग्रह हा श्री. दिग्विजयजी पवार यांच्या मालकीचा असून अनेक दुर्मिळ वस्तू येथे पाहायला मिळतात. या संग्रहात तलवारी, कट्यारी, खंजीर, गंजिफा, भांडी, नाणी, पत्ते तसेच घरगुती वापरातील अनेक वस्तूंचा खजिनाच आहे. श्री. पवार यांच्या संग्रहात एक दुर्मिळ अशी तलवार आहे. तिला दशावतारी तलवार म्हणतात. या तलवारीवर दहा दशावतार कोरलेले आहेत. अशा प्रकारची तलवार इतरत्र पहायला मिळत नाही.

श्री. पवार यांच्या पूर्वजांना मिळालेली विश्वासराव ही पदवी अभिमानाने मिरवत ते उत्साहाने संग्रहालय आणि गढी पाहण्यासाठी आपले स्वागत करतात. मग चला नगरदेवळ्याची गढी पाहायला.
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

https://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही