नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

Join the forum, it's quick and easy

नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
Would you like to react to this message? Create an account in a few clicks or log in to continue.
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 2 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 2 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


किल्ले अंतुरगड

Go down

किल्ले अंतुरगड         Empty किल्ले अंतुरगड

लिखाण  Admin Sun May 20, 2012 1:06 am

किल्ले अंतुरगड         5502_Mahas
अजंठा-सातमाळा या सह्याद्रीच्या पुर्वपश्चिम उपरांगेवर मोक्याच्या ठिकाणी अंतुरगड ठाण मांडून बसलेला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यामध्ये अंतुरगड किल्ला आहे. अंतुरच्या किल्ल्याला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक कन्नड कडून गौताळा अभयारण्यामधून एक रस्ता नागदकडे जातो. या रस्त्याला पुढे सिल्लोडकडे जाणारा एक उपरस्ता आहे. या रस्त्यावर आठ नऊ कि.मी. वर नागापूर नावाचे लहानसे गाव आहे. या गावातून अंतुरगडाकडे कच्चा रस्ता जातो. यामार्गावर खोलापूर म्हणून लहानशी वस्तीही वाटेत आहे. खोलापूरच्या पुढे असलेला रस्ता पावसाळ्यात खराब होतो. खोलापूर पासून सहा कि.मी. अंतरावर अंतुरगड आहे. हा मैलाचा चौकोनी दगड आहे. त्यावर काही शहरांच्या दिशा सांगितल्या असून हा इ.स. १६०८ मध्ये बसविल्याचा उल्लेख आहे. साधारण सपाटी असलेल्या या मार्गावरुन चालत पाच एक कि.मी. गेल्यावर आपल्याला अंतुरगडाचे दर्शन होते. अजंठा सातमाळा रांगेचे एक शृंग थोडे उत्तरेकडे घुसले आहे. या शृंगावरच अंतुरगड आहे.

दुसरा मार्ग जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यामधून आहे. नागोद गावा कडून अंतुरगडाच्या पायथ्याच्या दस्तापूरला पोहोचायचे. तेथून अंतुरचा पायथा गाठून डोंगर चढायचा.

हे दोन्ही मार्ग अंतुरच्या प्रवेशद्वाराजवळ एकत्र येतात. अंतुरच्या किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी हाच एकमेव मार्ग आहे. डोंगर उतारावर भरपूर झाडी असल्यामुळे ही चढाई फारशी दमछाक करीत नाही. अंतुरच्या पुर्व अंगाला असणार्‍या कड्याच्या पोटात दक्षिणेकडे तोंड करुन हा दरवाजा आहे. अरुंद जागेत दरवाजा असल्यामुळे तो समोर गेल्याशिवाय चटकन दिसत नाही. येथे दरवाजाच्या बाहेर पहारेकर्‍यांच्या जागा आहेत. काही वर्षांपुर्वीपर्यंत (१९९० पर्यंत) या दरवाजाला लाकडी दारे होती. ती आता बेपत्ता झाली आहेत. या दारातून आत गेल्यावर आतील मार्ग तटबंदीने बंदिस्त केलेला असून तो अरुंद आहे. या मार्गावर वरुन खूपच दगडी पडलेली आहेत. पुढचा दरवाजा मात्र पुर्व दिशेला तोंड करुन आहे. हा भव्य दरवाजा आहे. हा दरवाजा ओलांडून पुढे गेल्यावर तिसरा दरवाजा आहे.

दुसर्‍या दरवाजाच्या आतील बाजूच्या कमानीवर शिल्पे आहेत. अशी शिल्पे अनेक ठिकाणी पहायला मिळतात. पण येथे या शिल्पाबरोबर सजावटीसाठी तोफेचे चार गोळे वापरले आहेत. अशा प्रकारे केलेली सजावट महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेरही आढळत नाही. ही वैशिष्ट्यपूर्ण सजावट पाहून आपण तिसर्‍या दारावरील भव्य असा फारशी शिलालेख अवलोकन करुन गड प्रवेश करायचा.

आपला प्रवेश गडाच्या मध्यभागीच होतो. गड दक्षिणोत्तर पसरलेला असून तटबंदीने वेष्टित आहे. या तटबंदीच्या कडेने आपण उत्तर टोकाकडे चालू लागतो. उजवी कडील तटबंदीमध्ये काही बुरुज आहेत. डावीकडे एक टेकडी असून टेकडीच्या दक्षिण बाजूला भलामोठा तलाव आहे. टेकडीच्या उतारावर भव्य इमारत आहे. इमारतीच्या गच्चीवर जाता येते. त्यासाठी पायर्‍यांचा मार्ग आहे. टेकडीच्या माथ्यावर टेहाळणी करीता भलामोठा चौथरा बांधलेला असून त्यावर चढण्यासाठी उत्तरेकडून पायर्‍या आहेत. या चौथर्‍यावरुन संपुर्णगडावर लक्ष ठेवता येते तसेच येथून अंजठा-सातमाळा रांगेचे उत्तम दर्शन होते. उत्तरेकडील खानदेशाचा परिसर न्याहाळता येतो.

गडाचा दक्षिण भाग एका तटबंदीने वेगळा केलेला आहे. या तटबंदीमध्ये तीन दरवाजे आहेत. त्यापैकी मध्यभागी मोठा दरवाजा असून त्याला दक्षिण बाजूला दोन मोठे बुरुज आहेत. मधल्या टेकडीच्या पश्चिम उतारावर तटबंदीजवळ पाण्याचे टाके कोरलेले आहे.

गडाचा उत्तर भाग बालेकिल्ल्यासारखा असून तो अधिकच भक्कम करण्यात आला आहे. या बाजूला किल्ला हा डोंगर रांगेशी जोडला गेला असल्यामुळे या बाजूला मोठा खंदक कोरलेला आहे. खंदकाच्या माथ्यावर भक्कम तटबंदी असून या तटबंदीला चिलखती बांधणी आहे. एक तोफ ही इथे पडलेली आहे.

या भक्कम आणि बलदंड किल्ल्याची उभारणी एका मराठा सरदाराने केली होती. पुढे हा किल्ला अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात होता. मलीक अंबरच्या काळात येथे काही बांधकामे झाली. पुढे मोगली वावटळीत हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. इंग्रजांनी इतर किल्ल्याबरोबर याचाही ताबा पुढे मिळवला.

संपुर्ण गडाची गडफेरी करण्यात गडावर पोहोचल्यावर दोन तासांचा अवधी लागतो. एकूण पाच सहा तासांच्या अवधीत आपण अंतूरची भ्रमंती करू शकतो.

भक्कम आणि बेलाग बांधणी, सहा-सातशे फुटांचे राखीव कडे, डोंगर उतारावरची दाट झाडी, दरवाजांची अजोड बांधणी, शिलालेख, शिल्पे इत्यादी टिपून आपण गड उतरायला सुरवात करतो. गड पायथ्याच्या दस्तापूरला येवून आपली पावले सात आठ कि.मी. अंतरावरील नगर देवळाच्या गढीकडे चालू लागतात.
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

https://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही