नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


वासुदेव

Go down

वासुदेव         Empty वासुदेव

लिखाण  Admin on Sun May 20, 2012 1:09 am

वासुदेव         5331_Mahas
गातो वासुदेव मी ऐका
चित्त ठाई ठेवोनि भाव एका
कोणी काही तरी दान पुण्य करा
दान न द्याल तरी जातो माघारा गा..
राम राम स्मरा आधी
सांडा वावूग्या उपाधी
लक्ष लावोनि रहा गोविंदी गा..

संत साहित्यातील हा वासुदेव आजही आपल्या मनाचा ठाव घेतो. वासुदेव आपल्याला अंतर्मूख करतो. तांबड फुटल, कोबड्यानं बांग दिली, मंदिरात काकड आरती सुरू झाली. मंजिरी म्हणजेच छोटा टाळ आणि चिपड्याला मंजूळ नादात वासुदेव राम-कृष्ण नामाचा उदघोष करीत आपली प्रभात मंगल करतो. डॉ.रामचंद्र चिंतामण ढेरे यांनी वासुदेवाला लोकसंस्कृतीचे उपासक म्हणून संबोधले आहे. आजही तुळजापूर, पंढरपूर, आळंदी, कोल्हापूर आदी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी नदिच्या घाटावर वासुदेव दान पावलं, दान पावलं म्हणताना दिसतो. वुदेव तुळशीपुढे जे गाणे गातो ते असे..

तुळस वंदावी वंदावी माऊली, संताघरी सावली तुळस वंदावी
तुळस घालीत ऐसे पाणी, होईल पातकाची धनी
तुळसी घालीत ऐसे घटा, विघ्ने पळती बारा बाय

असा रामकृष्णाच्या नावाचा घोष करीत वासुदेव दारी येते. हातानाने टाळ चिपळ्या वाजवित देवाची नावे मोठ्याने गात येणार्‍या वासुदेवाची चाहुल लागताच बाळ गोपाळ साखर झोपेतून जागे होतात आणि अंगणात येऊन वासुदेवाभोवती गर्दी करतात. अंगातला घोळदार अंगरखा गळ्यातून पुढे दोन्ही कडे सोडलेला तांबडा शेला, डोक्यावरची मोर पिसाची शंकूच्या आकाराची ओपी, काखेभोवती झोळी, पायातले घुंगराचे चाळ आणि कमरेला बांधलेल्या शेल्यात खोचलेली बासरी पाहून मुले त्यांच्याकडे पाहत राहतात आणि त्यांच्या मुखीची भक्तीगीते ऐकण्यासाठी गृहिणी सडा घालता घालता थांबून प्रसन्न मुद्रेने उभ्या राहतात.

वासुदेवाचा हा वेश काहीसा विटका-फाटका असला तरी त्यांच्या या वेशाकडे पाहून बाळ गोपाळ वेडे होतात. तो मुखाने विशिष्ठ गाणी म्हणतो. गाण्याला साथ देण्यासाठी उजव्या हाताने चिपळ्या आणि डाव्या हाताने टाळ वाजवितो. जागच्या जागी पाय नाचवून पायातील घुंगराचा ध्वनी त्यात मिसळवितो आणि शेवटी गृहिणीकडून पसाभर धान्य व बाळ गोपाळाच्या हातून पै-पैशाचे दान मिळाले की, सर्व देवतांना दान पावल्याची मुखाने पावती देवून अंगाभोवती लयीत गिरक्या घेतो व पाव्याचा मंजुळ आवाज काढीत निरोप घेतो. तो अंगणातून निघून गेला की, त्याच्या त्या ध्यानाने त्या लयबद्ध गाण्याने आणि त्याने अखेरीस घुमविलेल्या पाव्याने वेडावलेले बाळगोपाळ मंत्रमुग्ध होऊन त्याच्या परतलेल्या आकृतीकडे कितीतरी वेळ पाहत राहतात.

हे दृष्य आता शहरातून क्वचित पहावयास मिळते. खेड्यातूनही बदलत्या काळाचे वारे वाहू लागल्यापासून त्याचे आकर्षण ढिले होऊ लागले आहे. एकेकाळी खेड्यापाड्यातून आणि शेवाड्यातून रामप्रहरी भक्तीसंगीत आळविणारा, बासरीच्या मधून आवाजाने घरा-आंगणात आनंद फुलविणारा आणि आपल्याच गितातील सरळ सीध्या बांधाने गृहिनीच्या नी घरधनाच्या हृदयात सदाचार लिलया ठसविणारा हा वासुदेव लोकांच्या आदराचा विषय होता. आमचे ग्रामीण जग जिवाचा कान करून त्याची गाणी ऐकत असे. गृहिणी सुपे भरून त्याला धान्य् वाढीत असत. त्याच्या हाती पै-पेसा देण्यासाठी बाळ गोपाळांची झुंबड उडत असे. शेतावर शेतकरी उदार मनाने धान्याच्या चार पेंढ्या त्यांच्या स्वाधीन करीत असत. लोक त्यांच्याकडे भिकारी म्हणून पाहत नसत, भ्याला भिक्ष वाढणे हे कर्तव्य मानले जाई. त्या तुच्छतेचा अवहेलनेचा भाव यतकिंचितही नसे. श्री.गो.मं.कालेलकर यांनी वासुदेवाच्या जातीविषयी असे लिहिले आहे की, ही एक धार्मिक भिक्षेकर्‍याची गावोगाव भटकणारी जात असून ते दक्षिण महाराष्ट्रात सर्वत्र आढळतात.

वासुदेव आपल्या मुलांना लहानपणापासूनच आपल्या कलेचे शिक्षण देतात. दिक्षा देण्याचा समारंभ मुलाच्या १५ वर्षे वयाच्या आत करतात.

खेड्यापाड्यातील यात्रा जत्रेत वासुदेवाची उपस्थिती असते. नदीच्या पात्रात उभे राहून वासुदेवास दान करण्याची पद्धत पुष्कळ ठिकाणी आहे. वाटेतील किंवा आजुबाजूच्या बिनहक्कांच्या गावी ते भिक्षा मागताना तो डोक्यावर मोरपिसाची टोपी घालतत नाहीत. वासुदेवाचे रहस्य काय आहे या विषयी असे लिहिले आहे की, वासुदेव देवकीचा मुलगा वासुदेव हा गाईच्या पाठीमागे रानात गेला म्हणजे तेथे सापडलेल्या मोरपिसाची टोपी करून तो डोक्यावर घाली. त्याचा दत्तक बाप नंद हा घरचा बरा असल्यामुळे श्रीकृष्णाच्या अंगावर एक सुंदरसा पिवळा नाहीतर तांबडा सेला असे.

आपला वासुदेव अशा श्रीकृष्णाचा मोठा भक्त आहे आणि म्हणून त्यांनी त्याचा वेष घेतला व नावही त्याचे घेतले.

गोविंदा रामा हो गोपाळा रामा जी जी
श्रीकृष्ण सोंगाड्याचे आम्ही बाळबागडे जी जी
आनंदे गाऊ नाचू परि पाहू त्यांच्याकडे जी जी
इंद्रिये गाई आमुच्या जाताती चोहींकडे जी जी
अनुहात वेणूनादे वळी आपणाकडे जी जी

असा हा श्रीकृष्णाचा बागडा बाळ सवंगडी दारी आला आणि श्रीकृष्णाच्या भक्तीची गीते आळवून त्याचा सनातन संदेश आपल्या साध्याभोळ्या भाषेतून गाऊ सांगू लागल्या. दानासाठी आवाहन करताना वासुदेव गृहिनी व घरधनी यांना उद्देशून गाऊ लागतो.

तुम्ही आया बायांनो द्या वासुदेवणीला चोळी
अहो लहान मुलीच्या द्या अंगीची काचोळी
घडी पाडावे लुगडे तुम्ही द्यावी याच वेळी
अहो पाटीलबाबा हा द्या शेला कृपा करून
आणि शाल-दुशाला टाकाव्या अंगावरी


या आवाहनाला उत्कट साद मिळते. घरोघरी अल्पस्वल्प दान मिळते. दान झोळीत पडताच वासुदेव दात्याला वाड वडिलांचे नाव विचारतो आणि मग दात्याच्या दिवंगत पितरांचा नामोच्चार करू महाराष्ट्रातील सर्व देवताना दे दान पावते करतो.

दान पावलं दान पावलं
पंढरपुरात इटोबारायाला
कोंढणपुरात तुक्काबाईला
जेजुरीमंदी खंडोबादेवाला
सासवडामंदी सोपानदेवाला
आळंदीमंदी ग्यानुबादेवाला
देहू मंदी तुकारामबाबाला
शिंगणापूराच्या महादेवाला
अंमळनेरच्या सखारामला
देऊहगावच्या बालाजीदेवाला
मुंगीपैठणात लाथमहाराजाला
कोपरगावाल कच्चेस्वराला
पुण्यामदी पारवतीला
भाबुड-यामंदी रोकडोबाला

ही देवदेवतांची् व साधुसंताची यादी लांबलचक असते. वासुदेवाला मुखीची ही स्वान पोथी विदर्भ मराठवाड्यासह सर्व महाराष्ट्राला व्यापणारी असते.

असा हा वासुदेव पहाटेच्या नामसंकीर्तनकार तुम्हाला आम्हाला चिंतनाला उपयुक्त ठरणारा लोक पुरोहित होय
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

http://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही