नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

Join the forum, it's quick and easy

नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
Would you like to react to this message? Create an account in a few clicks or log in to continue.
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 2 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 2 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


परफॉर्मन्स मॅनेजमेंटचा

Go down

परफॉर्मन्स मॅनेजमेंटचा Empty परफॉर्मन्स मॅनेजमेंटचा

लिखाण  Admin Thu May 31, 2012 12:56 am

मॅनेजमेंट म्हणजे केवळ मास्टर्स डिग्री असं समीकरण न ठेवता , व्यवहारात त्याचा कसा उपयोग करता येईल , याचा पालक आणि विद्यार्थ्यांनी विचार करणं आवश्यक आहे. पदव्युत्तर शिक्षणाच्या अनेक पर्यायांत मॅनेजमेंट हा अर्थातच एक आकर्षक पर्याय आहे. तुमची क्षमता आणि आवड असल्यास या कोर्सचा विचार करायला हरकत नाही.

कौशल्यं आत्मसात करा

संभाषणकला : मातृभाषा आणि इंग्रजीमध्ये (व्यवसायाची भाषा) आपले विचार स्पष्ट शब्दांमध्ये मांडता येणं आणि योग्य शब्दांत लेखी विचार व्यक्त करता येणं महत्त्वाचं आहे.

नेतृत्त्वगुण : आपल्या सहकार्यांशी , वरिष्ठांशी आणि हाताखालील कर्मचार्यांशी नेटका संवाद साधून त्यांना कार्यप्रवृत्त करणं हा गुण आवश्यक आहे.

समुहामध्ये काम करण्याची कला : एकटा माणूस कितीही तज्ज्ञ असला , तरी कोणतेही कार्य तडीस नेण्यासाठी समूहाची गरज असते. उद्योग-व्यवसायामध्ये सर्वांना सोबत घेऊन त्यांच्याकडून काम करून घेणे ही कला आहे.

निर्णय क्षमता : आपल्यासमोर निर्णयाकरता किंवा सहीकरता जे आकडे अथवा रिपोर्ट येतात , त्यावर जास्तीत जास्त अचूक निर्णय कमीत कमी कालावधीमध्ये घेण्यासाठी व्यवस्थापकीय कौशल्याची आवश्यकता असते.

जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर पदवी परीक्षेचे निकाल लागणार आहेत आणि त्यामुळे पदवीनंतर काय करायचं , याची तयारी विद्यार्थी करत आहेत. पदव्युत्तर शिक्षणाच्या अनेक पर्यायांत मॅनेजमेंट हा एक आकर्षक पर्याय आहे. मुंबई युनिव्हर्सिटीअंतर्गंत मॅनेजमेंटमध्ये एमबीए , एमएमएस , एमपीएम , एमसीए आणि एमसीएम हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यामध्ये एमसीए हा अभ्यासक्रम तीन वर्षांचा पूर्ण वेळ असून , त्याशिवाय सर्व अभ्यासक्रम दोन वर्षांचे पूर्ण वेळ कालावधीचे आहेत. याशिवाय पीजीडीबीएम हा अभ्यासक्रम दोन वर्षाचा आहे. या सर्व अभ्यासक्रमांपैकी एमबीए आणि एमसीए अभ्यासक्रमांसाठी तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे (डीटीई) सीईटी घेण्यात येते आणि गुणवत्ता यादीच्या आधारे केंद्रीय प्रवेश प्रकियेमार्फत प्रवेश देण्यात येतो. (अधिक माहिती 222. स्रह्लद्ग.शह्म्द्द.द्बठ्ठ वर उपलब्ध आहे.)

मानसिकतेत बदल

सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी आपली मानसिकता बदलण्याची प्रक्रिया सुरू करावी. केवळ चांगल्या मार्कांनी पास होणं , असा संकुचित उद्देश न ठेवता , मला हे ज्ञान व्यवहारामध्ये कशा तऱ्हेने
वापरता येईल , याचा विचार करणं आवश्यक आहे. आयआयटी /आयआयएमसार या नामांकित शिक्षण संस्थामध्ये विद्यार्थी अथक परिश्रम घेत असल्याचे दिसते. लायब्ररी , तसंच कप्युटर लॅबचा पुरेसा वापर करत हे विद्यार्थी अनेकदा रात्र-रात्र स्व-यंअध्ययन करीत असतात. वर्गामध्ये प्रवेश करताना विद्यार्थी आणि शिक्षक दोघेही पूर्ण विषयाची तयारी करून जातात. त्यामुळे वर्गामध्ये एका विशिष्ट पातळीवर चर्चा होते. शिक्षणामध्ये फक्त ऐकणं , श्रवण करणं यापेक्षा विद्यार्थी स्वत: अभ्यास करून शिक्षण प्रक्रियेमध्ये सहभागी होतात.

अशाच प्रकारे मॅनेजमेंटला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी विविध विषयांची , अभ्यासक्रमांची पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांनी स्वत: वाचण्याची तयारी ठेवली पाहिजे. प्रचलित ज्ञानाची , संकल्पनांची माहिती करून घेण्यासाठी अनेक पुस्तकं वाचून त्यावर स्वत:च्या टिपणी तयार करा. या टिपणीच्या सवयीचा नक्की उपयोग होऊ शकतो. आपल्याला नेमके मुद्दे या टिपणांमुळे मिळतात. तसंच , केवळ पाठ्यपुस्तकांपर्यंत वाचन मर्यादित न ठेवता , आपल्या विषयांशी संबंधित अनेक पुस्तकांचे संदर्भ विद्यार्थ्यांनी घ्यायला हवेत.

कॉलेज निवड

आपण प्रवेश घेत असलेले कॉलेज मान्यताप्राप्त आहे याची खात्री करून घ्या. कॉलेजमध्ये पूर्ण वेळ पुरेसे शिक्षक , लायब्ररी , कम्प्युटर लॅब , तसंच विद्यार्थ्यांच्या विकासाकरता घेण्यात येणारे विविध उपक्रम , या सर्व घटकांची प्रत्यक्ष भेट घेऊन खात्री केल्यानंतरच प्रवेशाचा निर्णय घ्या. यात दोन प्रकारे प्रवेश घेता येईल. एक केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमार्फत (मायनॉरिटी संस्था वगळता) ८० टक्के प्रवेश होतात आणि २० टक्के प्रवेश संस्था पातळीवर देण्यात येतात.

मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना त्यामध्ये आपल्या आयुष्यामधील महत्त्वाची दोन-तीन वर्षं आणि पैसा व वेळेची गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे प्रवेश घेताना , या गुंतवणुकीच्या मोबदल्यात आपल्याला करिअरसाठी आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी काय मिळणार आहे , याचा विचार करून मगच प्रवेश घेणे जास्त उचित ठरणार आहे.

डॉ. पराग काळकर, मॅनेजमेंट इन्स्टिट्युट संचालक
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

https://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही