नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

Join the forum, it's quick and easy

नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
Would you like to react to this message? Create an account in a few clicks or log in to continue.
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 2 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 2 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


किल्ले जीवधन

Go down

किल्ले जीवधन Empty किल्ले जीवधन

लिखाण  aplemarathijagat Sat May 19, 2012 9:26 pm

किल्ले जीवधन Jivdhan

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका हा गतकालीन इतिहासाच्या अनेक खाणाखुणा आपल्या अंगाखांद्यावर मिरवीत आहे. हा प्राचीन वारसा जपणार्‍या जुन्नर तालुक्यामध्ये नाणेघाट नावाचा घाटरस्ता आहे. जुन्नर शहराच्या पश्चिमेला साधारण २५ कि.मी. अंतरावर सह्याद्रीच्या मुख्य रांगेवर हा प्राचीन घाट मार्ग आहे.

सातवाहनांच्या काळात या घाटाची निर्मिती झाली असावी असे दिसते. नाणे घाटातील लेणी याला साक्ष आहे. लेणीतील मुर्ती आजमितीला तरी शिल्लक नाहीत. या मुर्तींचे पाय तेवढे ओळखू येतात. लेणीच्या भिंतीवर ब्राम्ही लिपीमधील शिलालेख आहे. दारात पाण्याची कुंडे आहेत. तसेच घाटमार्गावरही अनेक ठिकाणी पाण्याची टाकी कोरलेली आहेत. या घाटमार्गाने पुर्वीपासून मोठ्या प्रमाणावर व्यापार चालत असे. हा व्यापारी माल बैलांच्या अथवा गाढवांच्या पाठीवर लादून या घाटातून नेला अथवा आणला जाई. कोकणातील नालासोपारा तसेच कल्याण या बंदरामधून येणारा व्यापारी माल या घाटातून जुन्नर तसेच पैठणकडे जात असे. या व्यापारी मालाला या घाटामध्ये चोरांपासून संरक्षण दिले जाई. त्या बदल्यात त्यांच्याकडून टोलही आकारला जात असे. या घाटाच्या संरक्षणासाठी घाटमाथ्यावर जीवधन किल्ल्याची उभारणी करण्यात आली.

घाटाच्या माथ्यावर असलेल्या पठारावर घाटघर नावाचे गाव आहे. घाटघर गाव जीवधन किल्ल्याच्या पायथ्याला वसलेले आहे. जीवधन किल्ल्यावर जाण्यासाठी पुर्व तसेच पश्चिम बाजुंनी मार्ग आहेत.

गडावर जाणारे हे दोन्ही मार्ग कातळामधे कोरलेले होते. जीवधन किल्ल्याचा ताबा इंग्रजांनी घेतल्यानंतर गडावर जाणारे रस्ते सुरुंग लावून ध्वस्त करण्यात आले. त्यामुळे किंचीत अवघड झालेल्या या मार्गाने काळजीपुर्वकच चढाई करावी लागते. गडाचे दरवाजे, तटबंदी, पाण्याची टाकी, कोरीव गुहा, घरांची जोती गडावर पहायला मिळतात.

जीवधन किल्ल्याचे स्थान भौगोलिक दृष्टीने तसेच लष्करीदृष्टीने अतिशय मोक्यावर आहे. त्यामुळे हा किल्ला इतिहासकाळात महत्त्वाचा किल्ला होता. जीवधनवरुन, ढाकोबा, मच्छिंद्र, गोरक्षगड, सिद्धगड, माथेरान, पेब, प्रबळ, मलंगगड, माहुली, अलंग, कुलंग, मदन, कळसूबाई, हरिश्चंद्रगड, निमगिरी, हडसर, शिवनेरी असा विस्तृत प्रदेश दिसतो. स्वच्छ हवामानामधे मुंब्रा येथील पारसिकचा डोंगर तसेच भिवंडी जवळील कामनदुर्गही येथून दिसतात.

जीवधन किल्ल्याच्या पश्चिम अंगाला असलेला वांदरलिंगाचा सुळका पहाण्याजोगा आहे. पश्चिमेकडील दरवाजातून उतरुन आपण या सुळक्याच्या पायथ्याशी जावू शकतो. तसेच येथून नाणेघाटातही जाणारी पायवाट आहे. जीवधन किल्ल्याच्या भेटीत नाणेघाटाचा तसेच नानाच्या अंगठ्याला भेट देणे सोयीचे ठरेल.

जीवधनला येण्यासाठी घाटधरला यावे लागते. घाटघर गाडीमार्गाने जुन्नरला जोडलेलेआहे. तसेच आणे-माळशेज घाटाच्या पायथ्याला असलेल्या टोकावडे गावाकडून दोन तासांची नाणेघाटाची चढाई करुन घाटमाथा गाठावा लागतो. नाणेघाट हा गाडीमार्ग नाही हे लक्षात असू द्यावे.

aplemarathijagat
Member
Member

Posts : 47
Join date : 15/05/2012

वापस वरती Go down

वापस वरती

- Similar topics

 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही